महसूल व पोलिसांवर हल्ले करणाऱ्या 'त्या' वाळूतस्करांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रातील वाळू तस्करीतून महसूल व पोलिसांवर दगडाने हल्ला करणाऱ्या २५ पैकी तिघा हल्लेखोरांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले आहे. 


Loading...
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महसूल कर्मचाऱ्यांनी काहीकाळ काम बंद आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शाळा, महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने शाळकरी मुलांची अडवणूक टाळण्यासाठी काम बंद आंदोलन स्थगित करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिल्याने कामकाज पुर्ववत सुरू झाले.


----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.