हॉटेल मालकाचा विषारी औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सिनानदी पात्रात अतिक्रमण करूसिनानदी पात्रात अतिक्रमण करून हॉटेल बांधले असता महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारावाई केली असता हॉटेल मालकाने हॉटेल पाडू नये यासाठी विषारी औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि. ११) दुपारी घडली असून या प्रकरणी हॉटेल मालक पांडुरंग बोरूडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने संबंधित हॉटेल जमिनदोस्त केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिना नदीपात्रात अतिक्रमण करून पांडुरंग बोरूडे यांनी हॉटेल बांधले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार सीना नदीतील अतिक्रमणे हटविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून अतिक्रमण धारकांना स्वत:हून अतिक्रमणे काढण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या होत्या.

Loading...
मात्र तरीही अतिक्रमण न काढल्यामुळे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापेंसह पथक सोमवारी (दि. ११) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बोरूडे यांच्या हॉटेलवर कारवाईसाठी गेले होते. मात्र बोरूडे यांनी या कारवाईस विरोध करत एक विषारी औषधाची बाटली घेवून हॉटेलच्या छतावर चढले. यावेळी त्यांनी कारवाई सुरू केली तर विष पेवून आत्महत्या करण्याची धमकी दिली.

बोरूडे यांच्या या आंदोलनामुळे त्या ठिकाणी गोंधळ उडाला. मात्र त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि. रमेश रत्नपारखी यांना या घटनेची माहिती दिली असता ते तात्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहिल्यानंतर बोरूडे यांनी विषारी औषधी प्राशन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी बोरूडे यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महापालिकेच्या पथकाने त्यांच्या हॉटेलचे अतिक्रमण जमिनदोस्त केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.