पारनेरच्या बड्या उद्योगपतीवरील डाग पुसण्यास निलेश लंके सरसावले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात नावाजलेला 390 कोटी रूपयांच्या हवाला रॅकेट गैरव्यवहारातील जामीनावर सुटलेला पंचायत समिती सदस्या सुनंदा धुरपते यांचा पती सूर्यभान उर्फ सुरेश धुरपते याच्यावरील डाग पुसण्यासाठी शिवसेनेतून हकालपट्टी केलेले निलेश लंके यांनी उडी घेतली आहे. 


आज 1 जून रोजी जामगावमध्ये होत असलेल्या धुरपते याच्या वाढदिवसाची सुत्रे लंके यांनी हाती घेतले आहे. शेतकर्‍यांचा देशव्यापी संपास सुरूवात झाली असताना पक्षातून हकालपट्टी झालेले लंके व राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी केलेले धुरपते वाढदिवस साजरा करण्यासाठी पंधरा दिवसांपासून दंग आहे.

तालुक्यातील जामगाव येथे उद्योजक सुरेश धुरपते यांच्यावर पाच महिन्यांपूर्वी महसूल विभागाने केलेल्या कारवाईत दोन महिने जेलमध्ये जावे लागले होते. सध्या जामिनावर सुटलेले धुरपते यांनी जेलमधून सुटका होताच राष्ट्रवादीचे तालुक्याचे प्रमुख सुजित झावरे यांच्यावर आरोप करून निलेश लंके यांच्याशी जवळीक साधली.

गेल्या तीन महिन्यांपासून जामिनावर बाहेर असलेले सुरेश धुरपते डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी खटाटोप करीत आहे. मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप करीत धुरपते राष्ट्रवादीतून बाहेर पडले. लंके यांना आगामी विधानसभेला मदत करण्याचे आश्‍वासन या गैरव्यवहारातील बड्या उद्योगपतीने देले आहे.


शिवसेनेतून हकालपट्टी झालेले निलेश लंके आ.विजय औटी यांच्यावर अप्रत्यक्ष टिका सत्र राबवित असून दुसरीकडे भाळवणी गणाच्या राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्या सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते हे जेलमधून बाहेर पडताच राष्ट्रवादीचे तालुक्याचे सवसर्वा सुजित झावरे यांच्यावर टिका करीत आहे.

10 वर्ष आमदार असलेल्या कै.वसंतराव झावरे यांच्या पत्नी व जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या मातोश्री सुप्रियाताई झावरे यांना जिल्हा परिषद सदस्यत्व माझ्यामुळेच मिळाल्याचा बिनदिक्कत दावा सुरेश धुरपते यांनी करून झावरेवर टिका केली आहे. लंके-धुरपते यांच्या टिकासत्र व गैरव्यवहाराने डागळलेपणा दूर करण्यासाठी सुरू असलेल्या खटाटोपामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

’लंके-धुरपते यांचा शेतकरी संपाला विरोध?
जिल्ह्यातून सुरूवात झालेल्या शेतकरी संप देशपातळीवर पोहोचला असून गोरगरीब शेतकरी संपात सहभागी होत आहे. पारनेरमध्येही अपक्ष आ.बच्चू कडू यांनी शेतकरी संपाची हाक दिली. परंतु शिवसेनेतून हकालपट्टी केलेले निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर सुरेश धुरपते यांचा वाढदिवस आज 1 जून रोजी धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराने शेतकरी संपाला एकप्रकारे विरोध दर्शविल्याचे चित्र आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.