टँकर-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नी चिरडून ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव मनमाड महामार्गावरून कोपरगावकडून राहत्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या टँकरची धडक बसून झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कोकमठाण शिवारातील तीन चार परिसरात घडली. 

कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील बाळासाहेब ज्ञानदेव घोंगते (५२ )व त्यांची पत्नी शोभा बाळासाहेब घोंगते (४५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. घोंगते दाम्पत्य राहाता येथे नातवाला बघण्यासाठी व सोमवारी धोंड्याचा शेवटचा दिवस असल्याने धोंडा जेवणासाठी दुचाकीवरून जात असताना नगर-मनमाड महामार्गावरील तीनचारी कोकमठाण शिवारात मागून येणाऱ्या रसायनाने भरलेल्या टँकरची (आरजे १९ जीसी ९८७७) धडक बसली. 

यात दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर पडून त्यांच्या अंगावरून हा टँकर गेल्याने या अपघातात ते दोघे जागीच ठार झाले. यावेळी तात्काळ रुग्णवाहिका व पोलिस दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. टँकर पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आला. चालकास ताब्यात घेतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.