श्रीगोंद्यात भाजप नेत्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट,कार्यकर्त्याकडून कारवाईची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट टाकून ती दुसऱ्याने शेअर केली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन श्रीगोंदा तालुका भाजप पक्षाच्यावतीने श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना देण्यात आले. 

या निवेदनात म्हटले आहे की शनिवार दि.९ जून रोजी सायं. सहा वाजता बाबूलाल स्वामी नामक व्यक्तीने सोशल मिडीयावर(फेसबुक) पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनंद यांच्याबाबत अक्षेपार्ह पोष्ट टाकली होती. ती पोष्ट श्रीगोंद्यातील दिलीप मोरे नावाच्या व्यक्तीने शेअर केली. 

सदर पोष्टमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून यामुळे या नेत्यांचा अपमान झाला आहे. ती व्यक्ती दिलीप मोरे या नावाने दोन अकाऊंट चालवित असून, तो श्रीगोंद्यातील रहिवासी आहे. हा व्यक्ती नेहमी सोशल मीडीयावर राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय पक्ष याबद्दल आक्षेपार्य, विकृत, अश्लिल, अवहेलनात्मक लिहीत असतो. त्याने ही वादग्रस्त पोष्ट शेअर करुन पंतप्रधान व मुख्यमंर्त्यांची बदनामी केली आहे. 

तरी सायबर सेलव्दारे सदर घटनेची चौकशी करुन संबंधीतांवर देशद्रोह, बदनामी व आय.टी.ॲक्ट खाली गुन्ह्याची नोंद करावी व पुन्हा कोणी अशी बदनामी करणारे कृत्य करुन नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करणार नाही. तसेच अशा विकृत प्रवृत्तींना आळा बसेल. यासाठी कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन भाजप पक्षाच्या वतीने देण्यात आले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.