मुलीची छेड काढल्याने केडगावात तरुणास बेदम मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव उपनगरात शाहूनगर परिसरातील क्लासला जाणाऱ्या मुलीची छेड काढल्याच्या रागातून चौघांनी तरुणास लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना रविवारी घडली याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मारहाण झालेला तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोहेल शमसुद्दीन शेख (१९, रा. खाटिक मळा, शाहूनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. साेहेल जेवण करण्यासाठी जात असताना सागर भालसिंग, बिट्टू (पूर्ण नाव माहीत नाही), तुषार भालसिंग, दीपक ठोंबरे (सर्व रा. शाहूनगर, केडगाव) यांनी त्याला अडवले.सोहेलला खाटिक मळ्यात नेऊन त्याला लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्या सोहेलला उपचारासाठी आनंदऋषी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Loading...
साेहेल हा मुलीची छेड काढत होता. सदर मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साेहेल याच्यासह नौसिफ पठाण, भज्जू शेख, राजू बालम शेख, जुबेर बालम शेख (सर्व रा. केडगाव) हे क्लासजवळ थांबायचे, त्या वेळी सोहेल सदर मुलीस त्रास द्यायचा, तू मला आवडतेस, तू माझी झाली नाहीस तर तुला काेणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी सोहेलसह त्याच्या साथीदारांनी सदर मुलीस दिली. मुलीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.