पती-पत्नीस घरात घुसून मारहाण करून २० हजार लांबविले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तारकपूर येथील सिंधी कॉलनीत चौघा जणांनी घरात घुसून पती-पत्नीस मारहाण करत कपाटातील २० हजार रुपये बळजबरीने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. ९) सायंकाळी घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जान्हवी राजेश शर्मा (वय ३०, रा. सिंधी कॉलणी, तारकपूर) या कुटुंबासह घरात असताना आशिष गायकवाड (रा. लालटाकी, नगर) हा त्यांच्या दोन ते तीन अनोळखी मित्रांसह बळजबरीने घरात घुसला.

Loading...
घरातील २० हजार रुपये बळजबरीने चोरून नेत त्याने शर्मा दांम्पत्यास शिवीगाळ, दमदाटी करत घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच शर्मा व त्यांचे पती राजेश शर्मा यांना मारहाण करत दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.