भाजप सरकारने शेतकरी,मजूर,नोकरदार,व्यापारी सर्वांचाच अपेक्षाभंग केला - आदिक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशातील व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी, मजूर, नोकरदार, व्यापारी, उद्योजक सर्वांचाच अपेक्षाभंग केला आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई नियंत्रणाबाहेर आहे. नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सरकारला या विश्‍वासघाताची किंमत मोजावी लागेल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी व्यक्‍त केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त येथील कॉंग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात आदिक बोलत होते. येथे प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ध्वज उभारण्यात आला.पुढे बोलताना आदिक म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शेती, सहकार, उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती केली. मोठ्या प्रमाणावर विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्या भाजप सरकारला जनतेने यावेळी संधी दिली 

Loading...
यावेळी युवक शहराध्यक्ष योगेश जाधव, महिला शहराध्यक्ष अर्चना पानसरे, राजेंद्र पवार, दीपक चव्हाण, सरवरअली सय्यद, सुभाष आदिक, सुभाष राजळे, प्रशांत खंडागळे, अनंत पतंगे, डॉ. विलास आढाव, उत्तम पवार, हेमंत चौधरी, रईस जहागिरदार, विद्यार्थी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आकाश क्षीरसागर, शहराध्यक्ष निरंजन भोसले, भाऊसाहेब वाघ, सुनील थोरात, निखील सानप, ऍड. तुषार आदिक, ऍड. दीपक बारहाते, अर्जुन आदिक, प्रकाश पाऊलबुद्धे, राभाऊ औताडे, लक्ष्मण धोत्रे, भागचंद औताडे, नितीन गवारे, नितीन कासार, देवा कोकणे, सुधाकर बोंबले, राजू शेट्टी, सोहेल शेख उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.