शिर्डी विमानतळावर दुर्घटनांची मालिका सुरुच, सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्‍यातील काकडी येथे असलेल्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संरक्षक भिंतीला शनिवारी मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड विमानतळाच्या दक्षिणेच्या बाजूने पडले आहे. सातत्याने वेगवेगळ्या दुर्घटना या विमानतळाच्या परिसरात घडत आहेत. यामुळे विमानतळाच्या सुरक्षेचे प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला आहे. 
Loading...

शुक्रवारी (दि. 8) वादळाने प्रवाशी आगमन कक्षाच्या काचा फुटून मोठे नुकसान होते. त्या पावसाच्या ओलाव्यामुळेच ही सरक्षक भिंत खचून तिला भगदाड पडल्याचा अंदाज आहे. या सरक्षक भिंतीचे काम सुरू असताना काकडीतील ग्रामस्थांनी काम निकृष्ट प्रतीचे असल्याचे विमानतळ विकास प्राधिकरणचे तत्कालीन उपाध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्या निदर्शनास आणले होते.

शेवटी विमानतळाच्या उद्‌घाटनाला वर्ष उलटण्याच्या आतच ही भिंत पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानतळावर अनेक घटना घडत आहेत. यामध्ये तेथे भंडारगृहाला लागलेली आग, विमनातळावर घुसलेले कुत्रे, विमान धावपट्टीवरून घसरणे, वादळामध्ये विमानतळ मुख्य इमारतीच्या काचा फुटणे या सर्व घटना पाहता विमानतळावर संकटांची मालिकाच सुरू आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.