छिंदम प्रकरणात खा.दिलीप गांधी अडचणीत,राजीनामा नाट्यावर मौन!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मनपातील माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आपण उपमहापौरपदाचा राजीनामाच दिला नसल्याचा दावा करताना शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करून माझी बनावट सही असलेला राजीनामा राजकीय षडयंत्रातून मंजूर केल्याचा आरोप केला आहे. 


या आरोपानंतर सेनेच्या माजी शहर प्रमुख व महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम यांनी पलटवार करताना, छिंदमचा संबंधित राजीनामा त्याचे राजकीय गुरू खासदार दिलीप गांधी यांनीच महापौर कार्यालयास पाठवला होता, असा दावा केला आहे. 


Loading...
छिंदम व सेनेतील या आरोप-प्रत्यारोपाने खासदार गांधी अडचणीत आले असून, त्यांनी या वादावर मौन बाळगले आहे, शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर छिंदमची हकालपट्टी करून व त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे खासदार गांधी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते व आता छिंदमच्या भूमिकेबद्दल ते मौन बाळगून आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.