आज आहेत या राजकारणी आणि प्रतिष्ठीत लोकांचे वाढदिवस !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :1 जून हा भारतातील अनेक जणांचा जन्मदिनांक असतो. आज 2018 साली हयात असलेल्या पाचपैकी किमान एका वृद्धाचा 1 जून हा वाढदिवस असतो. अहमदनगर जिल्हा आणि राज्यातील अनेक राजकारणी आणि प्रतिष्ठीत लोकांचे आज वाढदिवस आहेत.

तरूणांसह वृध्दांनाही आजच्या सोशल मिडियाने भुरळ घातली आहे. आज 1 जून रोजी सर्वांच्या फेसबूकवर शेकडो जणांच्या वाढदिवसाची यादी आली असेलच, भरपूर प्रतिष्ठीत लोकांचे वाढदिवस हे आज आहेत. 

आदीवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यासह नगर जिल्ह्यातील माजी मंत्री तथा अकोलेचे आमदार मधुकर पिचड, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले,जि.प.चे चे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जि.प.चे माजी सभापती बाबासाहेब तांबे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्यासह गावोगावी नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस आहेत. आज सोशल मिडीयावर शुभेच्छा संदेशांचा धुमाकूळ पहावयास मिळत आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.