अकोल्यात बस व पिकअपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील रंधा गावाजवळ इगतपुरी-पुणे बस व पिकअपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात ९ जण जखमी झाले असुन जखमींना राजुर ग्रामीण रूग्णालयात हलविले आहे.

इगतपुरी-पुणे ही बस रंधा पुलाजवळ घोटीकडे जाणाऱ्या पिकअपला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडकली. सुदैवाने सदर अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना राजुर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची माहिती समजताच राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी यांनी घटनास्थळी भेट दिली.

Loading...
जखमींमध्ये गणेश रमेश मोरे, विठ्ठल अरूण गोरे, रोहिणी संतोष सुर्यवंशी, सुनिता बाळाहेब वाकचौरे, रंजना साहेबराव गोपाळे, सुमनबाई रखमा सुर्यवंशी, लहानबाई रमेश गोरे, प्रियंका संतोष सुर्यवंशी, तनुजा संतोष सुर्यवंशी यांचा समावेश आहे. जखमींवर राजुर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.