सत्तेत आलेल्या भाजपने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले - आ.वैभव पिचड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर १५ वर्षे सत्तेत असताना राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांना सदैव साथ देऊन देशाला शेतमाल निर्यात करणारा देश बनविला, मात्र गेल्या तीन वर्षापासून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी विरोधी या सरकारला २०१९ मध्ये सत्तेतून घालविण्याचा संकल्प करुन त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आ.वैभवराव पिचड यांनी केले.

Loading...
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा २० व्या वर्धापन दिनानिमित्त अकोलेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष कार्यालयात तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी आ. पिचड बोलत होते. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, जेष्ठ नेते मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे, पक्षाचे सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, नगराध्यक्षा संगिताताई शेटे, तालुका महिला अध्यक्षा चंद्रकला धुमाळ, युवक अध्यक्ष शंभू नेहे आदी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.