जुगार अड्डयावर छापा,अडीच लाख रुपयांची रोकड जप्त.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील मेहेकरी शिवारात जुगार अड्डयावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकत अडीच लाख रुपयांची रोकड जप्त करण्याची कारवाई रविवारी केली. या प्रकरणी २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी (दि.१०) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नगर-पाथर्डी रोडलगत कृषी मेहेकरी फाटा येथे विनारवाना जुगार खेळला जात असल्याची माहिती नगर ग्रामीणचे सहा.पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांना मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता तेथे २० ते २३ जण बसलेले आढळून आले.

त्यांच्याजवळ एक स्टिलचा डबा असून, त्यामध्ये पांढऱ्या कागदाच्या नाव लिहिलेल्या चिठ्ठ्या होत्या. या चिठ्यांवर पैशांची बोली लावली जात होती. ज्या व्यक्तीचे नाव चिठ्ठीमध्ये निघेल, त्या व्यक्तीला पैसे मिळेल, असे ठरवून हार-जितीचा जुगार विनापरवाना बेकायदेशिररित्या खेळताना आढळून आला.

Loading...
यावेळी जनार्धन आसाराम आंधळे, गंगाराम आप्पा बडे, संजय नामदेव बडे, भगवान महादेव बडे, गणेश लक्ष्मण देवकर, पोपट आसराम वनवे, बाळासाहेब पाराजी बडे, दामोराम भाऊ वनवे, रावसाहेब नामदेव वनवे, सतीश महादेव वनवे, रामकिसन नाथू वनवे, अतुल वामन पवार (सर्व रा. मेहेकरी, ता.नगर), मारुती राधाजी जगताप, भगवान पांडुरंग पोटे, रमेश दादाभाऊ तळेकर (तिघे रा. रतडगाव, ता.नगर), अशोक विश्वनाथ पोटे, किशोर भास्कर पोटे (दोघे रा. बारदरी, ता.नगर), रघुनाथ पांडुरंग बडे, गोरख मारुती पालवे (दोघे रा. शाहपूर, ता.नगर), राजू चांदभाई शेख, लक्ष्मण सुंदर ठोंबे (दोघे रा.खांडके, ता.नगर), दिलीप नारायण बेरड (रा. सोनेवाडी, ता.नगर), महेश दयाराम बंग (रा.नगर) यांची अंगझडती घेतली असता एकूण अडीच लाख रुपयांची रोकड त्यांच्याकडे आढळून आल्याने ती जप्त करून त्यांच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार ॲक्ट कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.