जमिनीच्या वादातून हिवरे बाजारमध्ये पती-पत्नीस मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथे शेती वाटपाच्या कारणावरून भांडणे होवून यामध्ये पती-पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजु दामोधर ठाणगे (वय ४२) हे शनिवार दि. ९ रोजी आपल्या घरासमोर असताना विठ्ठल उर्फ बाळू बाबा ठाणगे, बाबा यशवंत ठाणगे, द्रोपदा बाबा ठाणगे, छाया विठ्ठल ठाणगे (सर्व रा. हिवरे बाजार) यांनी शेती वाटपाच्या कारणावरून वाद घालत यातील बाळु ठाणगे याने हातातील काठीने राजू ठाणगे यांच्या उजव्या खांद्यास व हाता-पायास मारहाण केली.

Loading...
यावेळी राजू ठाणगे यांची पत्नी भांडणे सोडविण्यास मध्यस्थी करत असताना छाया ठाणगे हिने त्यांच्या करंगळीस चावा घेवून जखमी केले. तसेच बाबा ठाणगे व द्गोपदा ठाणगे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमध्ये राजू ठाणगे व त्यांच्या पत्नी ललिता या जखमी झाल्या असून या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.