भंडारदरा धरणात राजस्थानच्या तरूणाचा बुडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भंडारदरा धरण परिसरात पर्यटनासाठी जयपुर (राजस्थान) येथून आलेल्या पर्यटकाचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये सध्या काजवा महोत्सव सुरु असुन या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नाशिक येथील एका कंपनीतील तीस युवकांचा समुह भंडारदरा धरण परिसरात पर्यटनासाठी आला होता. या सर्व तीस युवकांनी रात्रभर भोजनाचा व काजव्यांचा आनंद घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी यातील काही अतीउत्साही तरुण आंघोळ करण्यासाठी भंडारदरा धरणात उतरली.

Loading...
समंत साईराम (वय २१ ) हा राजस्थान मधील जयपूरचा तरुणसुद्धा पाण्यात उतरला होता. समंतला पाण्यात पोहता येत नसल्याने तो पाण्यातच गटागंळ्या खाऊ लागला आणि लगेच पाण्यात बुडाला. भंडारदऱ्याच्या एका धाडसी तरुणाने पाण्यात उडी घेऊन तरुणाला पाण्याच्या बाहेर काढले.

धरण काठावर असलेल्या काही तरुणांनी पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. पुढील उपचारासाठी राजुर येथे ग्रामीण आरोग्य केंद्रात त्याला हलविण्यात आले. मात्र त्याची प्रकृती आणखीच खालावल्याने पुढील उपचारासाठी लोणी येथे नेत असतानाच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.