अखेर शिर्डीतील 'त्या' अर्धनग्न महिलेचे पोस्टर हटविले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डीतील पथदिव्यांवर लावण्यात आलेली एका हिंदी मालिकेचे अर्धनग्न पोस्टर अखेर हटविण्यात आले. नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने अर्धनग्न अवस्थेतील पोस्टर काढून टाकण्याचे आदेश ठेकेदारास दिले. 

एका खासगी वाहिनीवरील मालिकेतील महिलेच्या अर्धनग्न पोस्टरवरून शिर्डीत प्रचंड नाराजी पसरली होती. याबाबत स्थानिक महिला, भाविकांकडून संताप व्यक्‍त केला जात होता. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांवरील या पोस्टरची चांगलीच चर्चा सुरू होती.

Loading...
केवळ अधिकाधिक पैसा मिळविणे हेच ध्येय न ठेवता किमान साईंच्या भूमीत तरी नगरपंचायत प्रशासनाने असे प्रकार रोखावेत, अशी मागणी शिर्डीकरांनी केली होती. सध्या शिर्डीत साईबाबा समाधी शताब्दी वर्षाची लगबग आहे. त्यामुळे शहरात नियमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू असते.

त्यामुळे नेहमीपेक्षा यंदा भाविकांची गर्दी टिकून आहे. येथे अगदी देश, विदेशातून भाविकांचा राबता असतो. यामध्ये सहकुटूंब देवदर्शनासाठी येणारे अनेक असतात. त्यामध्ये महिलांसह लहान मुलांचे प्रमाण मोठे असते. त्यातच शिर्डी शहरात प्रवेश करतानाच अगदी रस्त्याच्या मधोमध असलेल्या पथदिव्यांवरील खांबांवर एका खासगी वाहिनीवरील मालिकेतील महिलेचे अर्धनग्न अवस्थेतील पोस्टर लक्ष वेधून घेत होते. 

दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने अर्धनग्न अवस्थेतील पोस्टर काढून टाकण्याचे आदेश ठेकेदारास दिले असून .यापुढे जाहिरातीतील मजकूर दाखवून पूर्वपरवानगी घेऊन नगरपंचायत प्रशासनाला दाखवून लावण्यात यावा, अशा सूचना मुख्याधिकारी दिघे यांनी ठेकेदारास केल्या आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.