शिवसेना पदाधिकार्याचा मित्राकडूनच डोक्यात दगड घालून खून


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात शिवसेनेचे शहर संघटक असलेल्या शाम कैलास चव्हाण याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

सचिन उर्फ जंगल्या गणेश साटोटे याने जुन्या भांडणाची कुरापत काढुन शाम यांच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिर्डी येथे उपचार सुरू असताना दुपारी शाम चव्हाणचा मृत्यू झाला.
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की शाम हा रात्री एक ते दीड वाजता भगवा चौक शनीमंदिराजवळ फोनवर बोलत असताना सचिन उर्फ जमल्या गणेश सातपुते यांनी शामच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शाम चव्हाण यांना उपचारासाठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल शिर्डी येथे हलवण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना शाम चव्हाण मयत मयत झाला राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी कोपरगांव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले  

हे दोघे शिवसैनिक व जिवलग मित्र होते घटनेच्या दिवशी दोघेही सायंकाळपासून बरोबर होते.मृत तरुण शिवसेना शहर संघटक म्हणून कार्यरत होता.याबाबत कोपरगाव शहर पोलिसात मयत शामचा भाऊ निलेश प्रदीप चव्हाण यांनी फिर्याद दिली होती सदर फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.