राहुरीत वाळूतस्करांचा तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालूक्यातील शेरी चिखलठाण येथील मुळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरु असताना छापा टाकण्यास गेलेल्या तहसिलच्या पथकावर वाळू तस्करांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तहसीलदारांसह ३ जण जखमी झाले असून २ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Loading...वाळू तस्करांनी तहसीलच्या पथकावर जोरदार दगडफेक केल्याने पोलिसांच्या हातातील राइफलचे तुकडे करून ती पळवून नेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याबाबत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून १० वाळू तस्करांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ११ ब्रास वाळूसह ३ ट्रॅक्टर, २ जेसीबी, २ डंपरसह ९८ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली गेली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.