शनी शिंगणापूर देवस्थान सरकार ताब्यात घेणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शनी शिंगणापूर देवस्थान हे शिर्डी व कोल्हापूर प्रमाणेच सरकार ताब्यात घेणार असून अध्यक्ष व विश्वस्तांची निवड सरकार करणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. त्याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की शिंगणापूर देवस्थान हे सरकारच्या ताब्यात घेण्याचा सरकारच्या विचाराधीन असून त्याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे.Loading...
शिंगणापूर देवस्थान सरकारने ताब्यात घेतल्यानंतर कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व विश्वस्तांची निवड सरकारकडून होणार आहे. त्यासाठी सरकार देवस्थानची घटना बदलू शकते. १९६३ सालची शिंगणापूरचा जो मूळ रहिवासी आहे तीच व्यक्ती विश्वस्त होऊ शकते परंतु नवीन नियमानुसार राज्यातील कुणीही शिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त होऊ शकतो.

शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त होण्यासाठी शनी शिंगणापूर गावातील सुमारे १०४ ग्रामस्थांनी धमार्दाय आयुक्तांकडे अर्ज केले होते त्या मुलाखती होऊन ११ ग्रामस्थांना विश्वस्त होण्याची संधी मिळाली. १९६३ सालापासून शिंगणापूरची परंपरा या निर्णयाने धोक्यात येणार आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.