नगर तालुक्‍यात जावयाकडून सासूला मारहाण !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्‍यातील पारगाव येथील बोडखे वस्ती येथे जावयाकडून सासूला मारहाण केल्याची घटना घडली आहे. 


या बाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी मिना भिवसेन घुले (रा. बाळेवाडी ,ता.जि.अ.नगर ) या व त्यांचे पती भिवसेन घुले नातु रूद्र यास भेटण्यास पारगाव येथील बोडखे वस्ती येथे भेटण्यास गेले असता, फिर्यादीने नातु रूद्र यास तु आमच्या बरोबर चल असे म्हणल्याचा राग येऊन जावई कालीदास बोडखे याने फिर्यादीचे पती भिवसेन लक्ष्मण घुले तसेच मच्छिंद्र श्रीपती घुले यांच्या डोक्‍यावर लोखंडे फावडे मारून त्यांना गंभीर जखमी केले.तसेच फिर्यादीस शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण केली.

या प्रकरणी सासुने दिलेल्या फिर्यादीवरून जावई कालीदास बाबासाहेब बोडखे, रावसाहेब एकनाथ बोडखे, सिंधुबाई बाबासाहेब बोडखे (सर्व राहणार, बोडखे वस्ती पारगाव,वाळुंज ,ता.जि.अ.नगर ) यांच्या विरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दाखल केलेल्या फिर्यादीवरून मारहाणीच्या गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल खैरे हे करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.