नेवाशातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांत मोठी नाराजी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील ३२ हजार ५४५ बोंडअळीग्रस्त शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत असून अनुदानाची रक्कम वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर खरीप पिकांसाठी कर्ज उपलब्ध करावे लागणार आहे. अनुदानाची मदत मिळण्यात वेळ जात असल्याने शेतकऱ्यांत मोठी नाराजी आहे. 

खरीप पिकासाठी पूर्व मशागतीचा खर्च करावा लागतो. ७ मे रोजी अनुदानाचा पहिला हप्ता जिल्ह्याला प्राप्त झाला असून नेवासा तालुक्यात ३२ हजार ५४५ शेतकऱ्यांच्या २२०४५.८९ हेक्टरसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० प्रमाणे २९ कोटी २६ लाख ६९ हजार ७४० रुपये मंजूर झाले असून ही रक्कम तहसिल कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. 

तलाठी, ग्रामसेवक आणि कृषि अधिकारी यांच्याकडून कपाशीचे पंचनामे झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांची यादी तहसिल कार्यालयात जमाही केली,मात्र अचानक इंग्रजी यादी तयार करण्याचा आदेश मिळाल्यामुळे तलाठ्यांची धावपळ झाली आहे. 

त्यामुळे १-२ दिवसात जमा होणारे अनुदान आठ-दहा दिवस उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. मान्सून वेळेवर धडकणार असून शेतकरी मात्र खरीप हंगामाच्या पूर्व मशागत खर्चासाठी चिंचातूर आहे. मे महिना संपला तरी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.