केडगाव दगडफेक प्रकरणी ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-पुणे महामार्गावरील केडगाव येथील पंचम वाईन्ससमोर रिक्षावर उलटी केल्याच्या कारणावरून वाद होवून दोन गटात भांडण झाले. या भांडणाचे पुढे दगडफेकीत पर्यावसन होऊन परिसरात एकच खळबळ उडाली. 

यामध्ये दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाले असून या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ३० ते ३५ जण पसार झाले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या दिड महिन्यांपूर्वी केडगाव येथील झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर केडगाव धुमसतच आहे. 

 याबाबत सविस्तर माहिती अशी की, केडगाव वेशीजवळील पंचम वाईन्स समोर मंगळवारी (दि.२९) रात्री उभ्या असलेल्या रिक्षावर उलटी केल्याचा राग येवून वाद झाला. या वादाचे पुढे हाणामारीत पर्यावसन होवून मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.