स्वस्त विमानसेवा असलेल्या इंडिगो कंपनीचा विमानप्रवास आता महागणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :इंधनदरात वाढ झाल्यामुळे स्वस्त विमानसेवा असलेल्या इंडिगो कंपनीचा विमानप्रवास आता महागणार आहे. कंपनीने तिकिटारवरील इंधन अधिभरात ४०० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक विमान तिकीट आता ४०० रुपयांपर्यंत महाणगार आहे. इंधन दरवाढीचा बोजा प्रवाशांकडून वसूल करण्याची घोषणा करणारी इंडिगो ही पहिलीच एअरलाईन्स कंपनी ठरली आहे.

 विमान इंधन (एटीएफ)चे वाढते दर लक्षात घेता ३० मेपासून इंधन अधिभारात वाढ करण्यात येत आहे, असे कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे १ हजार किमी विमान प्रवासमार्गावर प्रत्येकी तिकिटावर २०० रुपये अधिभार वाढवण्यात येणार आहे. तर एक हजार किमी पेक्षा लांबच्या प्रवासासाठी ४०० रुपये अधिभार आकारण्यात येणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.