पारनेर मध्ये तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील रुईछत्रपती येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि.३० रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली. हणुमंता अप्पा मोरे (वय २७) रा . वाळवणे, ता. पारनेर, असे मयत युवकाचे नाव आहे. 

याबाबतची माहिती अशी की, दि.३० रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वाळवणे येथील ७ - ८ तरुण रुईछत्रपती तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील हणुमंता मोरे हा युवक पाण्यात बुडाला, तो परत वर न आल्याने साथीदारांनी त्याचा खूप शोध घेतला ; परंतु तो न सापडला नाही. 

याप्रकरणी राजू यल्लप्पा मोरे रा. वाळवणे यांनी दिलेल्या खबरीनुसार सुपा पोलिसांनी घटनेबाबत आप्पत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले. त्यानुसार दि. ३१ रोजी सकाळी स्थानिक नागरिक, मयताचे नातेवाईक, पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांनी अथक प्रयत्नांनी सकाळी १०च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. 

पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. हा तलाव जुना असल्याने त्यात मोठया प्रमाणात गाळ साचल्यामुळे अशा घटना घडत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाँ. बाळासाहेब अकोलकर करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.