नेवासे तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. मोटरसायकल,लाखोंचा ऐवज पळविला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे तालुक्यातील देवसडे येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर गावातील मुख्यपेठेत सहा घरी चोरट्यांनी जबरी चोरी करून लाखोंचा ऐवज लांबवला. यात एक रायफल व पल्सर मोटार सायकल चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 


घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक शरद गोर्डे यांनी भेट देऊन श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलावून घटनेच्या ठिकाणाचे ठसे व चोरट्यांचा माग काढण्यासाठी मदत घेतली.चोरीचा तात्काळ तपास लावण्यासाठी एलसीबीचे पथक पाचारण केले.

Loading...
देवसडे येथील पोलिस पाटील विठ्ठल घोडेचोर यांच्या घरी चोरट्यांनी तीन-साडेतीन तोळे रोख रक्कम नवीन साड्या चोरी गेल्या. तर बाळासाहेब उगले यांच्या घरातून रायफल व तीन-साडेतीन तोळे सोने साड्या व घरातील कपाटाची उचकाउचक करून विश्वास उगले, शिवाजी उगले, शहादेव बेबंळे यांच्या घरातून देखील नवीन साड्या व रोख रक्कम चोरीला गेली. 

चोरट्यांंनी उपसरपंच अरविंद घोडेचोर यांची पल्सर (एमएच १७ एपी ९४१७) ही मोटारसायकलही लांबवली. चोरीची उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम चालू होते. तालुक्यातीलच अंतरवली येथील अमोल काकासाहेब वाबळे यांच्या घरी रात्रीच्या वेळी चार-पाच जणांच्या टोळीने घरात घुसून त्यांच्या हातात असलेल्या गज डोक्यात मारला व हिंदीतून बोलून पैसे, दागिन्यांची मागणी केली. 

घरातील वस्तू बळजबरीने उचकत आई सुनंदा व बायको शीतल यांच्या गळ्यातील पोत, कानातील कुडके कर्णफुले असा अंदाजे दोन तोळे व खिशातील रोख रक्कम तीस-चाळीस हजार रुपये असा एकूण सत्तर-पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.