शेतीच्या वादातून संगमनेरात कटरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे शेतातील ऊस का मोडला असे विचारले असता त्याचा राग अनावर झाल्याने एका जणाने जवळील लोखंडी कटरने छातीवर व पोटावर वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना शनिवार दि. ९ जून रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. 

याबाबत माहिती अशी की, बिरेवाडी याठिकाणी सुदर्शन विष्णु ढेंबरे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ढेंबरे हे आपल्या शेतामध्ये असणाऱ्या ऊसाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते.

Loading...
त्यावेळी जालिंदर ढेंबरे हा मोटारसायकलीवरुन त्या ठिकाणाहून जात असताना ढेंबरे हे म्हणाले की, तु ऊस का मोडला असे विचारल्याचा राग जालिंदर ढेंबरे याला अनावर झाल्याने त्याने सुदर्शन याला शिविगाळ करुन लाथ मारली व त्याच्या हातातील लोखंडी क टरने सुदर्शन याच्या छातीवर व पोटावर वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी महेंद्र सुर्यभान ढेंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी जालिंदर ढेंबरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस
निरीक्षक दिलीप निघोट हे स्वत: करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.