मुख्यमंत्री खोटारडे,सरकारने सर्वांची फसवणूक केली - खा.सुप्रिया सुळे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :या सरकारने सर्वांची फसवणूक केली आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे चोंडी येथे आल्या असता त्यांनी अहिल्यादेवीचे दर्शन करून गढीची पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण दिले जाईल अशी गर्जना बारामती येथे येऊन केली होती. या घोषनेला आता चार वर्षे झाली, तरी त्यांना आरक्षणाचा निर्णय घेता येईना. हे मुख्यमंत्री खोटारडे आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मी लोकसभेत प्रश्न मांडला, पण आरक्षण देता येणार नाही असे संबंधीत मंत्र्यांनी सांगितले होते.

खासदार सुळे म्हणाल्या, पालघर निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्लिप प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी वापरलेली भाषा अशोभनीय आहे. निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार झाली आहे. त्याची दखल घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.