अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उघड


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे,गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने हैदराबादमधील गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईच्या खास संपत नेहराला अटक केलीये. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी मागण्याचे 24 पेक्षा जास्त गुन्हे हरियाणासह अनेक राज्यात दाखल आहे. 

अटकेनंतर एसटीएफने केलेल्या चौकशीत सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता आणि यासाठी मुंबईतील त्याच्या घराची रेकी केली होती अशी कबुली त्याने दिली.संपत नेहराने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलमानच्या घराची रेकी केली होती. 

Loading...
संपत नेहरा सलमानचा चाहता असल्याचं भासवून हत्या करण्याच्या प्रयत्न करणार होता. जेव्हा सलमान घराच्या बाल्कनीत उभं राहुन चाहत्यांना अभिवादन करतो त्यावेळी त्याच्या हत्येचा मनसुबा संपतचा होता. एवढंच नाहीतर फॅन्स आणि सलमानमध्ये किती अंतर असतं याचाही आढावा घेऊन गोळी झाडण्याचा संपतचा डाव होता. 

पण संपत आपल्या कटात यशस्वी होण्याआधीच एसटीएफच्या टीमने हैदराबादमधून त्यांच्या मुसक्या आवळल्या.कट कोणत्या परिस्थितीत अयशस्वी होऊ नये यासाठी त्याने सलमान घरातून किती वाजता बाहेर येतो आणि सुरक्षारक्षकांची माहितीही गोळा केली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.