दोन दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दोन दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
Loading...
गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या विरोधात अघोषित संप पुकारला होता. आज मुंबईत संपाच्या तोडग्यासाठी एसटी कामगार संघटना आणि एसटी सीईओ याच्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली होती. 

त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबत बैठक पार पडली. या बैठकीत तीन वेतनवाढ बाबत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांची थकबाकी 48 हप्त्यात दिली जाईल. तसंच सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता राज्य सरकार प्रमाणे देणार असल्याचं मान्य करण्यात आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.