आरोपी महिलेने कोठडीतच दिला बाळाला जन्म.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :खूनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिलेने मुलाला जन्म दिल्याची घटना श्रीगोंद्यात मंगळवारी घडली. तालुक्‍यातील भिंगाण येथील वैभव पारखे या सात वर्षीय चिमुकल्याच्या खून प्रकरणातील न्यायालयीन कोठडीतील काजल शांतीलाल पारखे हिची प्रसुती झाली. 

Loading...
काजलला मंगळवारी प्रसुतीपूर्व वेदना होऊ लागल्याने लगेच ग्रामीण रुग्णालयात तिला हलविण्यात आले. रुग्णालयात नेताच तिने मुलाला जन्म दिला. मंगळवारी दुपारी बारा वाजच्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला.

तालुक्‍यातील भिंगाण येथील वैभव पारखे या सात वर्षांच्या मुलाचा खुन झाला होता. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी वैभव (दीर) याच्या खून प्रकरणी काजल पारखे (भावजयी) हिला अटक केली. काजलला अटक करण्यापूर्वी ती गर्भवती होती.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यामधील महिला पोलीस दरमहा काजल ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करीत असत. परंतु काजलने आठव्याच महिन्यात मुलाला जन्म दिला. काजलला आठ दिवसानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. 

कोठडीत असताना प्रसूतीपुर्व वेदनांचा त्रास होऊ लागल्याने काजलला पोलीस कोठडीतून बाहेर काढले. काजलची श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती सुखरुपाने झाली. मुलाचे वजन कमी आहे, पण आई सुखरुप आहे. पोलीसांनी कोठडीत असताना काजलची काळजी घेऊन माणुसकीचा धर्म पाळला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.