पाहुण्यांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे पाहुण्यांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणाचा विहिरीत पोहताना बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. 

Loading...
लक्ष्मण सखाराम ढोणे (वय ३२ रा), कासारवाडी, चकलांबा, ता. गेवराई असे या मृत तरुणाचे नाव आहे, याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ढोरज़ळमाव येथील येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेत कामाला असणारे रामेश्वर परमेश्वर पिंगळे यांना भेटण्यासाठी लक्ष्मण व सखाराम हे पिता- पुत्र ढोरजळगाव येथे आले होते.

दुपारच्या सुमारास लक्ष्मण पोहण्यासाठी विहिरीत उतरला; परंतु पोहत असताना त्याला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.