वाळूउपशाला विरोध करणाऱ्या २२ महिलांवर गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील आघी येथील अधिकृत लिलाव वाळू उपशाला दिघी येथील महिलांनी विरोध करत वाळूउपसा अडवला. तसेच वाळूच्या ट्रॅक्टरला आडवे उभे राहून शिवीगाळ करून ट्रॅक्टर पेटवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला २२ महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, कर्नल चंद्रकांत भांबरे रा.चंदननगर, पुणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, संतोष संपत जगताप यांनी आघी येथील सीना नदीपात्रातील वाळूचा लिलाव घेतला आहे. त्याचे व्यवस्थापक म्हणून फिर्यादी भांबरे हे काम पहात आहेत.

Loading...
दि. ८ जून रोजी सकाळी अकरा वाजता ट्रॅक्टरद्वारे वाळू घेऊन जात असताना. कर्जत तालुक्यातील दिघी येथील महिला शोभा हौसराव मंडलिक, वनिता कैलास निंबाळकर, प्रियांका प्रमोद भोईटे,रुपाली बापू महारनवर, संगीता बाळासाहेब निंबाळकर, सुनंदा हनुमंत निंबाळकर, शोभा देविदास महारनवर, सुनीता चंद्रकांत निंबाळकर, हौसाबाई किसन थोरात, गंगुबाई एकनाथ निंबाळकर, हिराबाई मोहन भोईटे, सुमन सुभाष भोईटे, अहिल्या आश्रू निंबाळकर, सविता मिलिंद निंबाळकर, सुमन गोरख निंबाळकर, प्रयाग प्रकाश निंबाळकर, अर्चना राजेंद्र निंबाळकर, शकुंतला अशोक निंबाळकर, केराबाई गणपत शेवाळे, साखरबाई मुकुंद भोईटे, सुमन बापूराव महारनवर,लता दिलीप निंबाळकर,अशा एकूण बावीस महिलांनी ट्रॅक्टरला रस्त्यात आडवे उभे राहून ट्रॅक्टरची हवा सोडून दिली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करत वाळूउपसा करण्यास विरोध केला. व येथे वाळू भरण्यास आल्यावर ट्रॅक्टर पेटवून देण्याची धमकी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.