..तर भानुदास कोतकर सह 21 आरोपींच्या संपत्तीवर टाच !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी भानुदास कोतकर याच्यासह २१ जणांविरोधात स्टँडिंग वाॅरंट बजावण्यात आले आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार हे वॉरंट काढण्यात आले आहे.वॉरंटनुसार ते पोलिसांत हजर झाले नाही, तर त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.

आरोपींना फरार घोषित करून त्यांच्या मालमत्तेवर टाच !
जारी केलेल्या वॉरंटची बजावणी करण्याबाबत आरोपींचा विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) शोध सुरू आहे. परंतु, अजून कोणीही हजर झालेले नाही. ते हजर झाले नाही, तर पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यानुसार आरोपींना फरार घोषित करून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कार्यवाही करण्याबाबतची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने या आरोपींविरुद्ध स्टँडिंग वॉरंट केले जारी -शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने फरार असलेल्या भानुदास कोतकर, औदुंबर कोतकर, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन सलीम शेख, विजय एकनाथ कराळे, रमेश तात्याभाऊ कोतकर, शरद रामचंद्र जाधव, दादा बन्शी येणारे, विनोद शिवाजी लगड, मनोज भाऊ कराळे, मयुर शाम राऊत, शरद वामन लगड, स्वप्निल पोपट पवार, संकेत शरद लगड, बाबासाहेब बापू कोतकर, राजू देवराम गांगड, अप्पासाहेब नामदेव दिघे, बाबुराव रामभाऊ कराळे, ज्ञानेश्‍वर यादव कोतकर (सर्व रा. केडगाव), वैभव धोंडिराम वाघ (रा. नालेगाव) अशा 21 जणांविरुद्ध स्टँडिंग वॉरंट (पोलिसांत हजर राहणे) जारी करण्याबाबतचा अहवाल तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी न्यायालयात सादर केला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.