विशाल कोतकरची 'नार्को' करण्यासाठी कोर्टात अर्ज.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी नगरसेवक विशाल कोतकर याची 'नार्को' टेस्ट (मानसोपचार तपासणी) करण्याबाबत पोलिसांच्यावतीने सोमवार, दि. ७ न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर आरोपीचे म्हणणे मांडण्यासाठी दि. १० मे तारीख नेमण्यात आली आहे. 



दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी संदीप गुंजाळ याची 'नार्को' टेस्ट करण्याबाबत पोलिसांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर मंगळवारी, दि. ८ आरोपी गुंजाळचे म्हणणे ऐकूण निर्णय होण्याची शक्यता आहे.  केडगाव येथील प्रभाग क्र. ३२ (ब) येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यात आ. संग्राम जगताप यांचेसह संदीप गुंजाळ, नगरसेवक विशाल कोतकर व इतरांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपी नगरसेवक विशाल कोतकर याची नार्को टेस्ट (मानसोपचार तपासणी) करण्याबाबत तपासी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.