औद्योगिक वातावरण सुधारण्यासाठी नगरमध्ये चांगल्या कंपन्या आणणार - खासदार गांधी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जसे रोजगार मागणारे आहेत, तसेच रोजगार देणारही असतात. या दोघांचीही योग्य सांगड युवा शक्ती प्रतिष्ठानने घालून नोकरी मेळाव्याचा चांगला पायंडा पाडला आहे. नोकरी मेळाव्यातून मिळालेल्या नोकरीमुळे तुम्ही आता कुटुंबाचे कर्ते होणार आहात. नगरमधील युवकांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी, तसेच नगरमधील औद्योगिक वातावरण सुधारावे, यासाठी चांगल्या कंपन्यांना नगरमध्ये पाचारण करणार आहे, अशी ग्वाही खासदार दिलीप गांधी यांनी सोमवारी दिली. 


खासदार गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवा शक्ती प्रतिष्ठान व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित नोकरी मेळाव्यात खासदार गांधी बोलत होते. यावेळी मेळाव्याचे उद्घाटन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांच्या हस्ते झाले.

सकाळपासूनच पेमराज सारडा महाविद्यालयात नोकरीसाठी मुलाखती देण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. गांधी म्हणाले, नगरमध्ये नोकरी मेळाव्यात युवक-युवतींना नोकरी देण्यासाठी ४० कंपन्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या मेळाव्यात सहभागी झालेले उमेदवार भाग्यवान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कील इंडिया योजना राबवून देशाला मोठ्या वेगाने प्रगतीकडे नेले आहे.

खासदार गांधी हे सुसंस्कृत नेतृत्व व व्यक्तिमत्त्व!
प्रा. मोडक म्हणाले, खासदार गांधी हे सुसंस्कृत नेतृत्व व व्यक्तिमत्त्व आहे. जिल्ह्याच्या विकास कामांना प्राधान्य देण्याबरोबरच सामाजिक उपक्रमही राबवत आहेत. रामदासी म्हणाले, सारडा महाविद्यालयात नोकरी मेळाव्यासारखा सामाजिक उपक्रम राबवला जात असल्याने या उपक्रमाला कायम सहकार्य करू. यावेळी आभार नितीन शेलार यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.