वहाडने नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी स्वकर्तृत्वावर एकही विकासकाम केले नाही!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय वहाडणे हे पूर्वी मंजूर होऊन सुरू असलेल्या कामांचे श्रेय लाटण्यातच दंग आहेत, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी सोमवारी हॉटेल स्पॅन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. जाधव म्हणाले, वहाडने हे नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी स्वकर्तृत्वावर एकही विकासकाम केलेले नाही. आता त्यात कोणी खोडा घालू नये. !
सध्या सर्व कामे फक्त माजी नगराध्यक्ष ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेली चालू आहेत. माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले, शहराला पिण्यासाठी रोज पाणी तसेच एमआयडीसी व कोपरगाव जिल्हा व्हावा असे वाटत असेल, तर निळवंडे धरणातून कोपरगावला येणाऱ्या पाण्याला कोणीही विरोध करू नये. आमदार कोल्हे यांनी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावठा करून त्यासाठी २७६ कोटीदेखील मंजूर करून आणले आहेत. आता त्यात कोणी खोडा घालू नये.

हा मुरूम व हे पैसे गेले तरी कोठे ?
शिवसेना गटनेते योगेश बागुल म्हणाले, ५ मे रोजी दोन हजार सहाशे ब्रास मुरुमाचे नगरपालिकेतून १३ लाख रुपयांचे बिल निघाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुमाचा वापर नेमक्या कुठल्या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आला याचा नगराध्यक्षांनी खुलासा करावा. शहरात एकाही ठिकाणी मुरुमाने खड्डे बुजवल्याचे दिसत नाही. मग, हा मुरूम व हे पैसे गेले तरी कोठे असा प्रश्न बागुल यांनी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.