रास्ता रोकोप्रकरणी १२५ आंदोलकांवर गुन्हे दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबी फाटा येथे रविवारी झालेल्या अपघातानंतर संतप्त जमावाने अडीच ते तीन तास महामार्गावर ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे घारगाव पोलिसांनी सुमारे १२५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता - रोको.
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबी फाटा याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू आहे. आठवडाभरात येथे तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. त्यातच पुन्हा रविवारी सायंकाळी परिसरातीलच दशरथ पांडे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन केले.

१०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल.
रात्री नऊ वाजता तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले; पण याप्रकरणी घारगाव पोलिसांनी १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी गु.रजि.नं. ५९/२०१८ नुसार भा.दं.वि. कलम १४३, ३४१ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)चे उल्लंघन, १३५ अन्वये १२५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अन्सार इनामदार करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.