आ.राहुल जगतापांमुळे ३३ गावांचा जलयुक्तमध्ये समावेश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : आ. राहुल जगताप यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नगर तालुक्यातील ३३ गावांचा सन २०१८ - १९ च्या जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाला आहे. जलयुक्तच्या कामांमुळे या लाभधारक गावांमध्ये मोठया प्रमाणात पाणी आडवण्याचे काम होणार आही, अशी माहिती राष्ट्रवादीचे नगर तालुका उपाध्यक्ष शरद बडे यांनी दिली. 

अधिक माहिती देताना बडे यांनी सांगितले की, नगर तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात बांध-बंदिस्ती , डीपसीसीटी, बंधारा, तलावातील गाळ काढण्याची कामे केली जाणार आहेत.

नगर तालुक्यातील नगर मंडळ अंतर्गत निंबोडी , बुऱ्हाणनगर, वारूळवाडी, आगडगाव, बाळेवाडी, भातोडी, पारगाव, देवगाव, खांडके, माथणी, मेहेकरी, पारेवाडी, दशमीगव्हाण, कोल्हेवाडी, सांडवे, टाकळीकाझी, भिंगार, नागरदेवळे, शहापूर,रतडगाव, जांब, बाराबाभळी, सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा, तर जेऊर मंडळातील नागापूर, वडगावगुप्ता, निंबळक, इसळक, देहरे, कोळपे आखाडा विळद, खारे कर्जुने, शिंगवेनाईक, इस्लामूर, नांदगाव या गावांचा प्रामुख्याने जलयुक्तमध्ये समावेश करण्यात आला असून, लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे बडे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.