स्विफ्ट डिझायर कारचा टायर फुटून चौघे जण गंभीर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारात एका स्विफ्ट डिझायर कारचा टायर फुटून चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दि. ७ मे रोजी दुपारी घडली.या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.


याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच ०२ एच १८५४ हिच्यावरील चालक शिवाजी भागाजी सांगळे (रा.शिरापुर, ता.संगमनेर), सुरेश बाजाबा गुरव, अर्जुन सोपान बांगर (दोघे रा.जुन्नर, जि.पुणे) तर अनंथा शंकर देसले (रा.दशमी गिते, ता.पेन, जि.रायगड) हे चौघे जण पुणे येथून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत होते.

सोमवारी दुपारी बोटा शिवारात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आले असता त्याच दरम्यान कारचा टायर फुटून ही कार दुभाजकावर आदळली. त्यामुळे हे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना कारमधून बाहेर काढले व औषधोपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.