संगमनेर मधील विद्याथ्र्याचा पुण्यात हृदयविकाराने मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्याथ्र्याला सोमवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. ऋषिकेश संजय आहेर (वय २५, रा. घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे या विद्याथ्र्याचे नाव आहे. हृषिकेश हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकत होता. 



आजच त्याचा दुसऱ्या सत्रातील पहिला पेपर होता. विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ४ मधील खोली क्र. १६ मध्ये तो राहायला होता. हृषिकेश नेहमी सकाळी लवकर उठायचा. सोमवारी नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हृषिकेश उठला आणि अंघोळीला गेला. साडेसहाच्या सुमारास त्याला अचानक त्रास होऊ लागला. तो ओरडायला लागल्याने शेजारील इतर विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे धाव घेत सुरक्षारक्षकांना बोलावून घेतले. यानंतर त्याला विद्यापीठातील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला ससूनला हलविण्यास सांगितले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.