अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवणारा ताब्यात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळून नेणाऱ्या शेषराव मोहन नेहरकर (वय २३ वर्षे, रा. निंबेनांदूर, ता. शेवगाव) या आरोपीस पिडीत मुलीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड येथून ताब्यात घेतले आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२ मे २०१६ रोजी अज्ञात आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून घेऊन गेला होता. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्ह्याचा तपास न लागल्याने तो अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे दि. १४ जुलै २०१७ रोजी पुढील तपासकामी वर्ग करण्यात आला होता. 

सोमवार दि.७ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सुचनाप्रमाणे पोहेकॉ. राजेंद्र वाघ, एकनाथ आव्हाड, सुनिल पवार, पोना. भरत डंगोरे, गणेश डहाळे, मपोना रिना म्हस्के, मोनाली घुटे यांनी आरोपी व पिडीत मुलीचा नगर व लगतच्या जिल्ह्यात शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी हा पिडीत मुलीसह जामखेड शहरात तपनेश्वर गल्ली येथे असल्याचे बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून आरोपी शेषराव नेहरकर यास पिडीत मुलीसह ताब्यात घेऊन पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.