हेलिकॉप्टरमध्ये फिरल्याने कुणी खासदार होत नाही,नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीचीच !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी कॉंग्रेसचे डॉ. सुजय विखे यांना चांगलाच चिमटा घेतला. खासदार व्हायचे असेल तर राष्ट्रवादीत या अशा शब्दात पिचडांनी डॉ. विखेंना एकप्रकारे उपरोधिक आव्हानच दिले आहे.तर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा. 
कोणीही उमेदवारी जाहीर केली, तरी नगर दक्षिण लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे व राहणार आहे. आघाडीबाबत व उमेदवाराबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे निर्णय घेतील. कुणाला उमेदवारी करायची असेल तर त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करावा.

हेलिकॉप्टरमध्ये फिरल्याने कुणी खासदार होत नाही.
हेलिकॉप्टरमध्ये फिरल्याने कुणी खासदार होत नाही आणि तिकीटही मिळत नाही, काँग्रेसनेही उमेदवारी ठरविण्याचे अधिकार स्थानिक किंवा राज्य पातळीवर दिलेले नाहीत, असा टोला माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता लगावला आहे.

आघाडीचा निर्णय खा.पवार व खा. राहुल गांधी घेणारच.
माजीमंत्री पिचड यांनी काल (दि.7) पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन जामखेड हत्याकांड व केडगाव हत्याकांडाविषयी माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आघाडीचा निर्णय खा.पवार व खा. राहुल गांधी घेणारच आहेत.दक्षिण लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असून या ठिकाणी राष्ट्रवादीच ही जागा लढवेल. तर शिर्डीची जागा काँग्रेस लढवेल. 

दक्षिण मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुक.
दक्षिण मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुक आहेत. योग्य व सक्षम उमेदवार देण्यात येईल. जे कोणी इतर पक्षातील इच्छुक असतील, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी मागणी करावी, असे म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.