केडगाव दुहेरी हत्याकांड - योगीराज गाडेसह ९ शिवसैनिकांना अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांपैकी नऊ शिवसैनिकांची कोतवाली पोलीस ठाण्यात शरणागती पत्कारत स्वत:हुन हजर राहिले आहेत. त्यांच्यावरील 308 (सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न करणे) हे कलम वगळण्यात आल्यावर हे सर्व आरोपी आज स्वतः कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले असून, तेथे त्यांना अटक करण्यात आली आहे.

7 एप्रिल रोजी दुहेरी हत्याकांड झाले होते. त्यामध्ये संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याचे केडगावमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. यावेळी जमावाने पोलिसांच्या वाहनांवर थेट दगडफेक करुन नगर-पुणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात हवालदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. रंजनकुमार शर्मा यांनी विशेष पथकाचीही स्थापना केली होती. मात्र वरिष्ठांच्या दबावामुळे त्यांच्याकडून कारवाईला दिरंगाई होत होती

अटक झालेल्यांची नावे
रावजी नांगरे
प्रफुल साळुंके
गिरीश शर्मा
सुनिल वर्मा
अमोल येवले
अभिजित राऊत
दत्तात्रय नागपुरे
योगीराज गाडे
राजेश सातपुते

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.