विठ्ठलराव लंघे नेवासा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भविष्यात मोठी संधी मिळाली, तर आणखी विकास कामे करू, असे वक्‍तव्य विठ्ठल लंघे यांनी करून आपण नेवासा मतदारसंघातून येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत  यामुळे माजी आमदार व विद्यमान आमदार यांना पर्याय म्हणून लंघे यांचा तालुक्‍यातील जनता स्वीकार करेल काय? हे येणारा काळच ठरवेल. भविष्यात काय घडामोडी होतील हे जरी सांगता येणार नसले तरी लंघे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरल्यास लढत रंगतदार होईल हे मात्र नक्की! 


विधानसभा निवडणूक लढविण्यास आपणही इच्छुक 
जिल्हा परिषद सदस्य असताना व अध्यक्ष झाल्यानंतर नेवासा तालुक्‍यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भरभरून निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्‍यात मोठी विकास कामे उभी राहिली. परंतु, येणाऱ्या काळामध्ये चांगली संधी मिळाली तर, मोठी विकास कामे करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी केले. लंघे यांनी यावेळी एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास आपणही इच्छुक असल्याचे सुतोवाच केले. याचीच चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये सुरू होती.

संधी मिळाली तर ते संधीचे सोने करतील !
पंडित कोठुळे म्हणाले, विठ्ठलराव लंघे यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या काळात आम्हाला कधीच निधी कमी पडून दिला नाही. आम्हाला कधी कोणत्या आमदार, खासदारांची उणीव भासून दिली नाही. यामुळे भविष्यात विठ्ठलराव लंघे यांना संधी मिळाली तर ते संधीचे सोने करतील व तालुक्‍यातील जनतेला न्याय मिळेल. यासाठी आपण त्यांच्या मागे मोठी ताकद उभी करणार आहोत. आपण सर्वांनी यासाठी पुढे येऊन साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.