संगमनेर मध्ये जमिनीच्या वादातून हाणामाऱ्या; १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जमिनीच्या व शौचालयाच्या जागेवरुन दोन गटात तुंबळ हाणामाऱ्या झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा परिसरातील मोधळवाडी येथे गुरुवार ३ मे रोजी घडली. याप्रकरणी एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मारहाण करत जीवे मारण्याची धमकी
याबाबत अधिक पिंपळगाव देपा गावची मोधळवाडी याठिकाणी सुमन माधव थोरात ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास भाऊसाहेब तुळशीराम थोरात, शुभम भाऊसाहेब थोरात, संकेत भाऊसाहेब थोरात, तुळशीराम भाऊ थोरात, राहीबाई तुळशीराम थोरात, पुष्पा भाऊसाहेब थोरात या सर्वांनी सुमनसह यादव लक्ष्मण थोरात, नंदा सुभाष केदारी या तिघांना जमिनीच्या वादाच्या कारणावरुन शिविगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

जागेच्या वादाच्या कारणावरुन शिविगाळ व दमदाटी
तर दुसऱ्या फिर्यादीत भाऊसाहेब तुळशीराम थोरात यांनी म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास माधव लक्ष्मण थोरात, सुमन माधव थोरात, यादव लक्ष्मण थोरात, प्रकाश लक्ष्मण थोरात, सोमनाथ विठ्ठल थोरात, दत्तु बबन थोरात, दादाभाऊ बबन थोरात, पार्वताबाई बबन थोरात या सर्वांनी भाऊसाहेब यांच्यासह तुळशीराम भाऊ थोरात, पुष्पा भाऊसाहेब थोरात यांना शौचालयाच्या जागेच्या वादाच्या कारणावरुन शिविगाळ व दमदाटी करुन तुळशीराम यांच्या डोक्यात काठीने मारले. व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

१४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 
याप्रकरणी सुमन थोरात व भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या परस्पर फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास परांडे व पोलिस हेड कॉन्स्टेबल दशरथ वायाळ हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.