माजी सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जबाजी छबु अमोलिक ऊर्फ अण्णा (वय 75) यांनी आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटनाशनिवारी उघडकीस आली. त्यांच्या मागे एक मुलगा, सून, चार मुली असा परिवार आहे.

अल्पशिक्षित व अननुभवी असूनही त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने साडेतीन वर्षे चांगला कारभार सांभाळला होता. दिवंगत सरपंच भागवत खंडागळे यांच्या कलानाट्य मंडळाचे ते सदस्य होते. त्याकाळी त्यांनी एका नाटकात सरपंचाची भूमिका केली होती. पुढे 2002 मध्ये ते बेलापूरसारख्या मोठ्या गावाचे खरेखुरे सरपंच झाले होते.

आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास
एक मेच्या ग्रामसभेत त्यांनी ग्रामपंचायतीकडे विविध कामांच्या मागणीचा हक्क सांगताना नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीचे कर भरण्याचे कळकळीचे आवाहनही केले होते. गेल्या काही वर्षापासून ते आजारी होते. आजाराला कंटाळून त्यांनी खटकाळी गावठाण येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप अमोलिक यांचे ते वडील होत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.