राज्यातील पतसंस्थात दोन हजार कोटींचा घोळ - अण्णा हजारे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील अनेक पतसंस्थांच्या कारभारात घोळ आहेत. राज्यभरातील अनेक पतसंस्थात जवळपास दोन हजार कोटी रूपयांचा घोळ आहे. याबाबत सतत तक्रारी येत असतात. केडगावच्या अंबिका पतसंस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळवून देण्यासाठी चौकशी करून संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करू. असे आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केडगावच्या अंबिका पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या शिष्टमंडळाला दिले.

केडगावच्या अंबिका ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवी अनेक चकरा मारूनही मिळत नसल्याने ते हैराण झाले आहेत. या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन त्यांना याबाबत साकडे घातले. यावेळी अण्णांनी त्यांना आश्वासन दिले. त्यावेळी ठेवीदारांनी पतसंस्थेच्या गैरकारभाराची माहिती देऊन त्यांना येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला. ठेवीदारांकडे असलेल्या ठेव पावत्या व संस्थेच्या रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या रकमेतही प्रचंड तफावत असल्याने ठेवीदार हादरून गेले आहेत.

आपल्या पारनेर तालुक्यातील ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी Join व्हा अहमदनगर लाइव्ह च्या पारनेर स्पेशल Whatsapp ग्रुपला ! पुढील लिंकवर क्लिक करून 

ठेवींचे 'लाखांचे बारा हजार'
त्यांच्या ठेवींचे अक्षरश: 'लाखांचे बारा हजार' झाल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठेवीदार सातत्याने विविध मार्गांनी आपला आवाज उठवत आहेत. पतसंस्थेचे गेल्या चार-पाच महिन्यांपासून लेखा परीक्षण चालू असून गुंतवणूकदार पतसंस्थेत गेला, तर त्याला व्यवस्थापक, अध्यक्ष व संचालक मंडळ एकमेकांकडे बोटे दाखवत उडवाउडवीची उत्तरे देतात. 

तर आत्महत्याशिवाय पर्याय नाही!
एका ठेवीदार महिलेने आपल्या मुलीच्या लग्नासाठी संस्थेत मोठी ठेव ठेवली होती. मुलीचे लग्न जमल्यावर त्यांनी पैसे मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुलीच्या लग्नाची पत्रिकाही त्या घेऊन गेल्या पण, त्यांना एक रुपयाही परत मिळाला नाही. त्यामुळे हक्काचे पैसे असताना कर्जाने रक्कम घेऊन मुलीचे लग्न केले. अशाच घटना अनेक ठेवीदारांच्या बाबतीत घडल्याची माहिती ठेवीदारांनी अण्णांना दिली. तरी सर्व ठेविदारांना पैसे मिळाले नाहीत, तर आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याची कैफियत त्यांनी मांडली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.