आमदार कर्डिलेंचा व मुरकुटेंचा झटका गडाखांना माहित नाही का ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गडाखांच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांनी तालुक्‍यातील तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यांवर राजकारण करून आमदार कर्डिले यांना डिवचू नये. आमदार कर्डिलेंचा व मुरकुटेंचा झटका गडाखांना माहित नाही का? अशी बोचरी टीका बंधारा कृती समिती अध्यक्ष दत्तात्रय घोलप यांनी केली आहे.

आ. कर्डिले व मुरकुटे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडतात.
घोलप म्हणाले की, मागील पंचवार्षिकमध्ये नेवासा तालुक्‍यातील बंधारे कोरडे राहण्याचे श्रेय माजी आमदार शंकरराव गडाख यांना मतदानाच्या रूपाने तालुक्‍याने दिले. राहुरी तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी शिवाजी कर्डिले व नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे हे दोघेही एकत्रितपणे मंत्र्यांकडे जाऊन प्रत्येक बैठकीमध्ये मुळा धरणाच्या पाणी वाटपावर ठामपणे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडत आहेत. 

पाणी प्रश्नावर बोलण्याची त्यांची लायकी नाही.
या पंचवार्षिकमध्ये प्रत्येक वर्षी मुळा धरणावरील सर्वच बंधारे खालून वरपर्यंत (टेल टू हेड) भरले जात आहेत. परंतु शंकरराव गडाखांचा गॉगल (चष्मा) घातलेले शेतकरी संघटनेचे तथाकथित नेते त्रिंबक भदगले यांनी नेवासा तालुक्‍याच्या पाणी प्रश्नावर बोलण्याची त्यांची लायकी नसतांना पत्रके काढून आ. शिवाजी कर्डिले, आ.बाळासाहेब मुरकुटे, नेवासा व राहुरी तालुक्‍यातील भरलेल्या बंधाऱ्यांना नजर लावीत आहेत.

नेत्याचे अपयश तालुक्‍याला दाखवण्याची गरज नाही.
नेवासा तालुक्‍यातील मुळा व प्रवरा नदीवरील सर्व बंधारे गेले चारही वर्ष भरले जात आहेत. या भरलेल्या बंधाऱ्यांचे पाणी पूजन मोठ्या उत्साहाने स्थानिक शेतकरी करत असताना प्रत्येकवेळी गडाखांच्या पोपटांनी पत्रके काढून आपल्या नेत्याचे अपयश तालुक्‍याला दाखवण्याची गरज नाही. पण त्रिंबक भदगले यांना भरलेले बंधारे गडाखांच्या काळ्या काचांचा चष्मा घातल्यामुळे दिसत नाहीत व पत्रके काढून ते आमच्या आमदार मुरकुटे व आमदार कर्डिलेंनाही त्यामध्ये नावे ठेवीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.