नगर मध्ये चारिञ्याच्या संशयावरुन पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर मधील विळद भागातील गवळी वाडा परिसरात चारिञ्याच्या संशयावरुन पती कडून पत्नीची हत्या करण्यात आली आहे. पत्नीला मारल्यानंतर आरोपी पती स्वता एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. 


पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद  ?
स्वाती प्रवीण गडाप्पे (वय ३३) हिच्या डोक्यात आज पहाटे दगड घालून निर्घृणपणे पतीने हत्या केली आहे. प्रवीण गडाप्पे असे या आरोपी पतीचे नाव आहे.पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे आपल्या पतीला सोडून पत्नी नगरला माहेरी आली होती. तिला भेटायलाच आरोपी नगरमध्ये आला होता.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
Powered by Blogger.